Inflation : डाळींच्या किमतीत मोठी वाढ, डाळींच्या वाढत्या दरांवर सरकार ठेवणार नियंत्रण

एमपीसी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डाळींच्या किमतीत सातत्याने वाढ (Inflation) होत आहे. गेल्या एक वर्षामध्ये तूर ,मूग आणि उडीद डाळींच्या किमतींमध्ये अनुक्रमे 27 टक्के,8.5 टक्के आणि 6.70 टक्क्यांनी वाढ  झालेली आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहे. विरोधी पक्षातील नेते सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या नावाने विकास, भ्रष्टाचार, ईडी, सीबीआय अशा अनेक मुद्द्यांवर गरळ ओढत असताना दिसत आहे तर सत्ताधारी पक्ष आम्ही गेल्या १० वर्षांमध्ये  सर्वच क्षेत्रात सकारात्मक बदल घडून आणले आहेत असे  सांगताना  दिसत आहे. अशातच, सामान्य नागरिकांच्या रोजच्या आहारात लागणाऱ्या तूर, मूग आणि इतर डाळींचे भाव वाढत (Inflation) असल्यामुळे जनता हवालदिल झाली आहे. भू-राजकीय तणाव, इस्रायल-हमास युद्ध,  हौती आतंकवाद्यांचे रेड सी मधील वाढते वर्चस्व, रशिया-युक्रेन युद्ध या सर्व कारणांमुळे जागतिक पातळीवर कच्चे तेल, सोने-चांदी तसेच बऱ्याच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले ((Inflation) दिसत आहेत. अशा सर्व अडचणी असताना निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर  महागाईवर नियंत्रण आणि त्याचा सरकारवर रोष येऊ नये म्हणून सरकार विविध उपाययोजना आखत आहे त्यातच डाळींचे भाव कसे नियंत्रणात आणतील याच्यावर  सरकार विचार करत आहे.

Loksabha election 2024 : महाविकास आघाडीचा रविवारी(दि. 7 एप्रिल) रहाटणीत मेळावा; महाविकास आघाडीतील राजकीय नेत्यांची उपस्थिती

सरकारनं आता डाळ आयातदार, किरकोळ व घाऊक तसेच मोठे व्यापारी यांनी  दर आठवड्याला त्यांच्याकडे असलेला   डाळींचा  साठा किती आहे हे सांगावे लागेल. तसेच, सरकार आता डाळींच्या व्यापाऱ्यांवर निर्बंध आणण्याचा तयारीत आहे असेही समजते. तसेच सरकारने डाळ आयातदारांना डाळ आयातीसंबंधी नवीन सूचना अधिसूचित केल्या आहेत. डाळ आयातदारांनी कस्टम क्लिअरन्स झाल्यानंतर ३०  दिवसांच्या आत डाळ बाजारात उतरविण्याचे निर्देश दिले आहेत.  कोणत्याही परिस्थितीत आयातदारांनी ३० दिवसांपेक्षा जास्त डाळींची साठवणूक करू नये तसेच प्रत्येक शुक्रवारी सर्व आयातदारांना  विभागाच्या पोर्टलवर तूर आणि उडीद डाळींचा साठ किती आहे हे आयातदारांनी अद्ययावत करायचे निर्देश सरकारने डाळ आयातदारांना दिले आहेत.                                                      सध्या  बाजारात  तूर डाळ  140 रु, मुग डाळ 110 रु , उडीद डाळ 108 रु तर मसूर डाळ 97 रु आणि चना डाळ 75 रुपये प्रति किलो आहे.

सरकारला विश्वास आहे की,  वर उल्लेख केलेल्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या गेल्या तर डाळीचे भाव स्थिर राहतील आणि  ऐन निवडणुकीच्या तोंडावर सामान्य माणसाच्या खिशाला कात्री बसणार नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.