Pune : प्रचाराच्या धामधुमीत सुनेत्रा पवार यांनी लुटला क्रिकेटचा आनंद..

एमपीसी न्यूज – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या (  Pune) आज दत्तनगर, आंबेगाव परिसराच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, त्यांनी विविध सोसायट्यांना भेट देत नागरीकांशी संवाद साधला.. लेक विस्टा सोसायटीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या महिलांसमवेत सुनेत्रा पवार याही सहभागी झाल्या.

Onion Exports : ‘या’ सहा देशांना भारत करणार 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदार संघाकडे राज्याचेच नाहीतर देशाचं लक्ष लागलेलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. नणंद विरूद्ध भावजयमधील लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  एकदम काँटे की टक्कर असणाऱ्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान  आज सुनेत्रा पवार यांनी काही वेळाकरिता क्रिकेट खेळण्याचा आनंद (  Pune) लुटला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.