Maval LokSabha Election: मावळ लोकसभा निवडणुकीतील 3 उमेदवारांना नोटीस

एमपीसी न्यूज – निवडणूक खर्चाच्या दुस-या तपासणीवेळी निवडणूकीतील दैनंदिन (Maval LokSabha Election)खर्चाचा तपशील उपलब्ध करून न देणा-या मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील 2 उमेदवारांसह  निवडणूकीतील दैनंदिन खर्च तपासणीत तफावत आढळल्याबद्दल एका उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी नोटीस बजावली आहे.

मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने उमेदवाराने किंवा (Maval LokSabha Election)त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणुक खर्चाची नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी सादर करणे आवश्यक असते.

Krjat : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा आदिवासी पाड्यावर प्रचार

लोकसभा निवडणुकीकरिता उमेदवारांचा होणारा रोजचा खर्च निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष, 33- मावळ लोकसभा मतदारसंघ, निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, 5 वा मजला, अ विंग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नविन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, आकुर्डी, पुणे येथे दुस-या तपासणीवेळी दिनांक 7 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करण्याबाबत सर्व उमेदवारांना कळविण्यात आले होते.

मात्र या तपासणीवेळी निवडणूकीतील दैनंदिन खर्चाचे लेखे उपलब्ध करून न देणा-या यशवंत विठल पवार, रहीम मैनुदिन सय्यद या दोन उमेदवारांना  नोटीस बजावण्यात आली आहे. खर्चाची नोंदवही व खर्चाचे प्रमाणके उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीने तपासणीसाठी विहीत वेळेत सादर केले नाहीत,  त्यामुळे या उमेदवारांना नोटीस देण्यात आली असून या उमेदवारांनी आपला खर्च विहीत दिनांकास सादर केला नसल्याने उमेदवाराने लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 77 अन्वये खर्चाचे दैनंदिन लेखे ठेवण्यात कसुर केला आहे असे समजण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांच्या उपस्थितीत तसेच निवडणूक खर्च तपासणी प्रमुख अश्विनी मुसळे आणि सहाय्यक सविता नलावडे यांच्या अधिपत्याखाली लेख्यांची तपासणी करण्यात आली. नोटीस प्राप्त झाल्यापासून 48 तासांच्या आत उमेदवाराने खुलासा सादर करावा व पुढील तिस-या  तपासणीवेळी निवडणुक खर्चाचे लेखे मावळ लोकसभा मतदारसंघ, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष येथे न चुकता सादर करावेत. विहीत मुदतीत खर्च सादर न केल्यास भा. दं. वि. कलम 171 (1) अन्वये तक्रार दाखल करून वाहने, सभा इत्यादीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ रद्द करण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी, असे देखील नोटीसमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

निवडणूकीतील दैनंदिन खर्च तपासणीकरीता सादर केला असताना त्यात आढळून आलेल्या तफावतीबाबत सुहास मनोहर राणे यांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी नोटीस दिली आहे. पहिल्या तपासणीवेळी सुहास राणे यांनी खर्च निरीक्षक यांच्याकडे निवडणूक खर्च तपशील तपासणीसाठी उपलब्ध करून दिला नव्हता. दुसऱ्या तपासणीवेळी उपलब्ध करून दिलेल्या दैनंदिन खर्च तपशिलाची तपासणी केली असता निवडणुक खर्च करण्यासाठी स्वतंत्रपणे उघडण्यात आलेल्या बॅंक खात्यामधून हा खरच करणे अपेक्षित असताना आपल्या वैयक्तिक बॅंक खात्यातून निवडणूक खर्च करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले.

प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्याच खात्यातून उमेदवाराने सर्व निवडणूक खर्च करावा, असे भारत निवडणूक आयोगाने उमेदवारांकरिता असलेल्या निदेश पुस्तिका 2023 मधील 3.4 मध्ये स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्देशाचे उल्लंघन झाले असल्याचे निदर्शनास आले असल्याने सुहास राणे यांना नोटीस बजावण्यात आली असून 48 तासांच्या आत न चुकता निवडणूक खर्च नियंत्रण कक्षाकडे सादर करावा असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.