Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा 11 वर्षांनी निकाल; दोघांना जन्मठेप

एमपीसी न्यूज – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात ( Dr. Narendra Dabholkar ) विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी (दि. 10) निकाल दिला. न्यायालयाने पाच पैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करत दोघांना जन्मठेप सुनावली आहे.

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. डॉ. वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

Alandi : 135 कोटी जनतेचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे – अजित पवार

डॉ. नरेंद्र दाभोळकर 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. सकाळी सव्वा सात वाजताच्या ते ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या होत्या. ज्यात एक गोळी डॉ. दाभोलकरांच्या छातीत तर दुसरी गोळी डोक्यात गेली होती.

15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष सीबीआय न्यायालयात खटला सुरु झाला. दरम्यान या प्रकरणात पाच जणांवर आरोपपत्र ठेवण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर विशेष सत्र न्यायाधीश पी पी जाधव यांनी निकाल दिला. निकालात दोघांना दोषी ठरवून जन्मठेप सुनावण्यात आली तर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात ( Dr. Narendra Dabholkar ) आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.