Mundhava : अंधश्रद्धेचा कहर , मुंढव्यात युवतीवर अत्याचार

एमपीसी न्यूज  – मुलीच्या अंगात दैवीशक्ती येत असल्याचे सांगून तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने मुलीवर मागील दोन वर्षांपासून (2016 पासून) लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा परिसरात उघडकीस आला आहे. यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी शफिक रफिक शेख (वय 28, रा. कोंढवा), एक महिला आणि एक अल्पवयीन मुलगा यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील एका अल्पवयीन मुलीला बी.कॉमचे शिक्षण घेत असताना इंग्रजी माध्यम अवजड जात असल्यामुळे ती कॉलेजमध्ये सतत गैरहजर राहत होती. आणि त्यामुळेच तिला परिक्षेस बसता आले नाही. ही बाब तिच्या आईला समजली असता तिच्या आईने हे आपल्यावर आलेले संकट आहे असा समज करून घेतला आणि आपल्या मुलीला लोकांच्या सांगण्यावरून तिच्या मुलीच्या अंगात दैवीशक्ती येत असल्याचे समजून एका ओळखीच्या महिलेकडे उपचारासाठी घेऊन गेली.

त्या महिला पिडीत मुलीच्या कॉलेज मध्ये जात असत आणि तिला दैवीशक्तींबद्दल सांगून पिडीत मुलीस तिच्या मैत्रीणीसह घरी बोलवत आणि त्यांना ब्लॅकमेल करून तिच्याकडून हात पाय दाबून सेवा करून घेत. आणि तसे न केल्यास पिडीत मुलीला मारहाण करत. आणि जर का याबद्दल तिने तिच्या आईस सांगितले तर ती महिला मुलीचे तिच्या मानलेल्या भावासोबत अफेअर आहे असे सांगण्याची धमकी देत.

एवढेच नाही तर पीडितेला आरोपी महिला मंडप व्यावसायिक असलेला , या प्रकरणातील दुसरा आरोपी शफिक शेख याच्याकडे घेऊन जात. शफिक आणि त्याच्याकडे कामास असणारा एक अल्पवयीन मुलगा या दोघांनी मिळून महिलेच्या मदतीने पिडीतेस धमकावून  तिच्यावर मागील दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केला. या प्रकारास वैतागून पिडीत मुलीने घडलेल्या प्रकाराबद्दल अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्यांच्या मदतीने सामाजिक सुरक्षा विभागाकडे लेखी तक्रार दिली.

या तक्रारीची नोंद घेऊन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.