Pune : धक्कादायक! नरेंद्र दाभोलकरांवर झाडलेल्या गोळ्या खडकीतील; परंतु, सीबीआयकडून तपास नाही

एमपीसी न्यूज – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Pune) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर झाडलेल्या गोळ्या या पुण्यातील खडकी येथील दारुगोळा कारखान्यामधील होत्या. या गोळ्या बाहेर कशा आल्या या बाबत तपास करण्यात न आल्याचे सीबीआयचे तत्कालीन तपास अधिकारी एस. आर सिंग यांनी बचाव पक्षाच्या उलटतपासणीत सांगितले.

सविस्तर माहिती अशी, की डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयचे त्या वेळेचे प्रमुख सिंग यांची विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात बचाव पक्षाच्या वतीने ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उलटतपासणी घेतली. डॉ. दाभोलकर यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्या या खडकी दारुगोळा कारखान्यामधील होत्या.

Whats App HD Video : आता व्हाट्सअपवर पाठवा एचडी व्हिडीओ; व्हाट्सअपने आणले नवे फिचर

या बाबत तपास यंत्रणेला माहिती होती. मात्र, या गोळ्या बाहेर कशा आल्या याचा तपास करण्यात आला नव्हता. याबाबत सिंग यांची ॲड. इचलकरंजीकर यांनी उलटतपासणी करत जबाब विचारला. यावेळी त्यांनी तपास केला नसल्याचे सांगितले.

सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते, हे खरे आहे का? असे बचाव पक्षाने विचारले असता त्यांनी गोळ्या झाडल्या असे माझे म्हणणे नव्हते. ते केवळ संशयित असल्याची माहिती सिंग यांनी कोर्टाला दिली.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्यात सहा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून त्यातील दोनच साक्षीदारांना संशयित आरोपींची छायाचित्रे दाखवण्यात आली आहेत. इतर साक्षीदारांना छायाचित्रे (Pune) का दाखविली नाहीत, याचे कारण सांगता येणार नसल्याचे देखील सिंग म्हणाले.

दरम्यान, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे येरवडा कारागृहात होते हे माहिती होते. सगळे साक्षीदारही पुण्यातीलच आहेत, याची देखील माहिती होती. पण, मी त्यांची कारागृहातील ओळख परेड देखील केली नव्हती. या सोबतच खंडेलवाल आणि नागोरीला आम्ही क्लीन चीट दिली नाही असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.