Chinchwad : आनंदनगर तोडफोड प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या वादात वाहनांची तोडफोड केली. यात एकजण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 25) मध्यरात्री आनंदनगर, चिंचवड (Chinchwad) येथे घडली.

Pune : धक्कादायक! नरेंद्र दाभोलकरांवर झाडलेल्या गोळ्या खडकीतील; परंतु, सीबीआयकडून तपास नाही

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदनगर येथील कुपर कोपरा येथे नरेश भंडारी, आदित्य आवळू आणि त्याचा साथीदार दारू पीत बसले होते. तिथून सुभाष शिंदे हे जात होते. त्यांच्यात गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून भांडण झाले.

नरेश याने लोखंडी रॉड आणि आदित्य याने कोयत्याने सुभाष शिंदे यांना मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सुभाष यांचे नातेवाईक घटनास्थळी आले. त्यामुळे नरेश, आदित्य आणि त्यांच्या साथीदाराने परिसरातील वाहनांची तोडफोड करत नुकसान केले.

याप्रकरणी नरेश भंडारी, आदित्य आवळू आणि त्याच्या साथीदारावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत नरेश हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याच्या परस्पर विरोधात नरेश याच्या आईने फिर्याद दिली असून त्यानुसार सुभाष शिंदे याच्या विरोधात जबर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष शिंदे याच्या विरोधात सन 2018 मध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. तर आदित्य आवळू याच्या विरोधात याच वर्षी मारहाणीचा एक गुन्हा दाखल आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.