Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी केली दगडूशेठ गणपतीची आरती

एमपीसी न्यूज  – आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ लक्षवेधी ठरला ( Pune) असून यंदा प्रथमच अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट हे मतदारसंघात आमने सामने आले आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघातून लढणार आहेत. यामुळे राज्यातील जनतेचं या मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिले आहे. या सर्व घडामोडी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी आज पुण्यातील दगडूशेठ गणपतीची आरती केली.

Pune : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन

लोकसभा निवडणुकीसाठी  सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, अमोल कोल्हे , रविंद्र धंगेकर,सुनील तटकरे ,संजयकाका पाटील, उदयनराजे भोसले, ,  प्रणिती शिंदे, सुधाकर श्रृंगारे ‘हे’ उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत.   त्यामुळे  उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी  आज सकाळी लवकर दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन  गणपतीची आरती ( Pune)  केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.