Lohagad Fort : लोहगडावरील महादरवाजाचा  बुरुज पुन्हा दिमाखात उभा

एमपीसी न्यूज – लोहगडाची वाटचाल आता वैभवशालीतेकडे चालली ( Lohagad Fort) आहे. नुकतेच या गडाचे नामांकन युनोस्कोसाठी झाले आहे. गडावर आता सुधारणा होत आहेत. पुरातत्व विभाग त्या दृष्टीने कामे करत आहेत. गडावर सर्वप्रथम श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाने शिव मंदिराचा जीर्णोद्धार केला. हा  मंच गेली 25 वर्षे या ठिकाणी काम करत आहे .

स्थानिक ग्रामस्थ व लोहगड विसापूर विकास मंच एकत्र या ठिकाणी काम करत आहे. त्याचबरोबर पुरातत्व विभागाने गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, पायऱ्यांचे कामे, विंचू कडा वरील सेफ्टी ग्रील ,काही बांधकामांचे उत्खनन, तटबंदीवरील बांधकामे आदी कामे केली आहे .

गडावरील बांधकामे अनेक शतके उभी आहेत .त्यामुळे जीर्ण झाल्यामुळे काही बांधकामे ( Lohagad Fort) ढासळतात. महादरवाज्याचा बुरुज असाच काही वर्षांपूर्वी ढासळला होता. लोहगड विसापूर विकास मंचातर्फे त्यावेळेस पुरातत्व विभागाला निवेदन दिले होते. नुकताच हा बुरुज पुन्हा एकदा बांधला आहे त्यासाठी पुरातत्त्व  विभागाचे अधिकारी गजानन मांडवरे  यांनी यासाठी प्रयत्न केले.

Wadgaon Sheri : माजी नगरसेविका शितल शिंदे यांचे निधन

त्यामुळे  महादरवाजाचा बुरुज आता पुन्हा दिमाखात उभा आहे. या पडलेल्या बुरजामुळे पर्यटकांना धोका होता काही पर्यटक पडलेल्या बुरजावर उभे असायचे तर काही पर्यटक खालून चालत असायचे त्यामुळे एखादी जीवित हानी होऊ शकली असती. बुरुज बांधल्यामुळे  गजानन मांडवरे यांचे  मंचातर्फे अभिनंदन करण्यात आले. तसेच या विभागातर्फे आता गडावर सीसीटीव्ही पण बसविण्यात आले आहेत त्यामुळे गडावरील सर्व हालचालीवर पुरातत्व विभागाचे आता लक्ष राहील.

त्यामुळे हुल्लड पर्यटकांनी गडावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू नये नाहीतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. गडावरील शिव मंदिराचा काही भाग अजूनही बांधायचा आहे मंदिरासमोर फरशी फुटत चालली आहे.

 मंदिरासमोरील  भिंती पूर्ण ढासळल्या आहेत यावर काम करणे आवश्यक आहे गडावर ( Lohagad Fort)मोठ्या प्रमाणावर शिवभक्त येत असतात या विषयावरती नाराजी व्यक्त करतात तसेच गडावरती टॉयलेट  व्यवस्था नसल्यामुळे महिला पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होते, पाणी पिण्यासाठी वॉटर कुलर हवेत या दोन्ही मूलभूत गरजा आहे या दोन्ही गरजा ताबडतोब पूर्ण केल्या पाहिजे  तसेच अनेक वर्षापासून शिवमंदिराची बांधकामाची  मागणी मंचातर्फे वेळोवेळी  करण्यात आली आहे तसेच मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी सांगितले.

पूर्वी गड हा सूर्योदयला उघडायचा व सूर्यास्ताला बंद व्हायचा आता गड सूर्यास्ताला बंद होतो पण सकाळी नऊ वाजता उघडतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना लोहगड उघडण्याची वाट बघावी लागते उन्हाळ्यामध्ये पर्यटकांना सकाळी लवकर गडावर जायचे असते त्यांना ते जाता येत नाही . त्यामुळे शनिवार रविवार तरी सकाळी सात वाजता गड उघडावा अशी मागणी मंचाचे संस्थापक  सचिन टेकवडे, मार्गदर्शक संदीप गाडे अध्यक्ष विश्वास दौंडकर ,कार्याध्यक्ष सागर कुंभार ,अनिकेत आंबेकर ,सचिन निंबाळकर, गणेश उंडे, अजय मयेकर ,अमोल गोरे ,बसप्पा भंडारी, चेतन जोशी यांनी केली ( Lohagad Fort) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.