Pune : लोहगड व विसापूर किल्ल्यावर अखंड श्रावणी सोमवार अभिषेक संपन्न

एमपीसी न्यूज – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर (Pune) विकास मंच, लोहगड, घेरेवाडी,भाजे,पाटण,  पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच, विविध संघटनांतर्फे गेली 25 वर्षे किल्ले लोहगड व विसापूरवरील शिवमंदिरात अखंड श्रावणी सोमवारचे अभिषेक करण्यात येतात. यावर्षी देखील मोठ्या भक्तीभावाने शिवमंदिरात श्रावण महिन्यात अभिषेक संपन्न झाले.

 

फ्रेंड्स क्लब तळेगाव दाभाडे व यशस्वी ग्रुप सुदुंबरे या सामाजिक संघटना या उपक्रमात दरवर्षी सहभागी होतात. यामध्ये प्रामुख्याने लोहगड व विसापूर या दोन्ही किल्ल्यावरील शिवमंदिरात विधिवत मंत्रोच्चाराने अभिषेक व हर हर महादेवाचा गजर करण्यात येतो. तसेच या दिवशी गड किल्ले स्वच्छता करण्यात येते. नंतर लोहगडाच्या पायथ्याला असणाऱ्या शिवस्मारकावर पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात येतो. याशिवाय मंचाचे कार्यकर्ते वर्षभर न चुकता विसापूरवरील शिवमंदिरात दर सोमवारी अभिषेक व पूजन करतात. यामध्ये प्रामुख्याने सागर कुंभार, अनिकेत आंबेकर,मुकुंद तिकोने,अजय मयेकर,सचिन निंबाळकर हे कार्यकर्ते काम पाहिले.

Charohali :  बैलगाडा घाट, कुस्ती आखाड्याचे सुशोभीकरण; 12 कोटींचा खर्च

मंच, लोहगड, घेरेवाडी,भाजे,पाटण ग्रामस्थ व भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संघटित प्रयत्नातून आज दिमाखात पुन्हा कात टाकून उभा राहिलेला लोहगड आपणास पहायला मिळतो.  मंच आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. येथे दरवर्षी महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. लोहगडाच्या पायथ्याला भव्य शिवस्मारक उभे राहिले. मंचाच्या पाठपुराव्यामुळे लोहगडाचे तटबंदी, बुरुज, पायऱ्या, दिशादर्शक फलक इत्यादी दुर्गसंवर्धनाची कामे भारतीय पुरातत्व विभागामार्फत पूर्ण करण्यात आली आहेत. यानंतर नुकतेच विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिराचा देखील जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

श्रावणी सोमवारचे अभिषेक संपन्न करण्यासाठी मुकुंद तिकोणे, विश्वास दौंडकर, संदीप गाडे, सचिन निंबाळकर, चेतन जोशी, संताजी गाडे, बसप्पा भंडारी, गणेश उंडे, बाळु ढाकोळ, याप्रसंगी लोहगड,विसापूर किल्ल्याला  गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मंच कटीबद्ध आहे अशी भूमिका मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी व्यक्त (Pune) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.