Pune News : लोहगड पायथ्याशी शिवजयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच व ग्रामस्थांच्या वतीने किल्ले लोहगड पायथ्याच्या शिवस्मारकावर (Pune News) दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शुक्रवारी (दि.10)शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

मंचाच्या कार्यकर्त्यांनी सुंदर फुल माळांनी, रांगोळ्यांनी व भगव्या पडद्यांनी शिवस्मारक सजावट केली होती. दीपोत्सवात हजारो दिव्यांच्या लखलखाटात शिवस्मारक उजळून निघाले होते.(Pune News) शिववंदनेने महाराजांना अभिवादन करण्यात आले. शिव घोषणांनी गड परिसर दुमदुमून गेला होता.

H3N2 Influenza : गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, नीती आयोगाचं आवाहन

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन शिवभक्त शिवजयंतीच्या आदल्या दिवशी लोहगडवरून शिवज्योत प्रज्वलित करून आपापल्या गावी घेऊन जाण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. सर्व शिवमंडळांनी शिवस्मारकावर ज्योत प्रज्वलित करून महाराजांचा जयघोष केला. मंचाच्या वतीने आलेल्या शिवभक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या सर्वांची मंचाच्या वतीने चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवस्मारकवर प्रखर दिव्यांची व्यवस्था करण्यासाठी लोणावळा पोलीस ठाणे अंमलदार कवडे साहेबांनी सहकार्य केले.(Pune News) शिवजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी मंचाचे अध्यक्ष विश्वास दौंडकर, अनिकेत आंबेकर, सागर कुंभार, चेतन जोशी, सचिन निंबाळकर,संदीप भालेकर,प्रथमेश निंबळे,निलेश भोसले,अशोक भोसले,सचिन आमले,बाळू ढाकोळ, अजय मयेकर, संदीप गाडे, बसप्पा भंडारी, अमोल गोरे, आदी कार्यकर्त्यांनी योगदान दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.