Vadgaon : पुणे-मुंबई महामार्गावर कंटेनर पेटला

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई महामार्गावर कान्हे फाटा येथे एका कंटेनरला (Vadgaon) अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जुना पुणे मुंबई महामार्गावरून जात असलेल्या एका कंटेनरला कान्हे फाटा येथे अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपला मित्र मावळ टीम तसेच अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

 Pune : दोराबजी मॉलसमोरील 40 फूट खोल टाकीत मुलगी पडली, अग्निशमन दलाने केली सुखरुप सुटका

हा कंटेनर मुंबईहून पुण्याला जात होता. तनिष्का हॉटेलच्या समोर कंटेनरच्या इंजिन मध्ये आग लागली. यामध्ये कंटेनरची केबिन जळून पूर्णपणे खाक झाली आहे. या घटनेत एका दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले (Vadgaon) नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.