Lalit Patil : ललित पाटील प्रकरणी येरवडा कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी अटकेत

आता येरवडा कारागृह प्रशासन रडारवर

एमपीसी न्यूज – ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात ( Lalit Patil ) येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी  डॉ. संजय काशिनाथ मरसळे (वय 53) याला गुन्हे पोलिसांनी अटक केली आहे.

ललित पाटील याचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढविण्यासाठी त्याला मदत केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी ही अटक केली आहे. ललित पाटील याचा आजारावर कारागृहात उपचार करणे शक्य असतानाही त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यासाठी डॉ. मरसळे याने मदत केली होती.

Vadgaon : पुणे-मुंबई महामार्गावर कंटेनर पेटला

यापूर्वी ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते (वय 57,  रा. रक्षकनगर, खडकी) याच्यासह कारागृह रक्षक मोईस अहमद शेख (वय30 , रा. मूळ रा. देगलूर, नांदेड), समुपदेशक सुधाकर सखाराम इंगळे (वय 44 ) यांना अटक करण्यात आली होती.

यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यात डॉ. संजय मरसळे यांचा सहभाग दिसून आला.  सुधाकर इंगळे मार्फत डॉ. संजय मरसळे यांना पैसे मिळाले होते.मरसळे हा ललित पळून जाण्याच्या 2 दिवस आधी त्याच्याशी संपर्कात होता. तसेच मरसळे यांच्या मोबाईलमध्ये अभिषेक बलकवडेचे “कॉल” सापडले आहेत.  बलकवडे हा ललित पाटीलचा ड्रग्ज कंपनी सांभाळणारा साथीदार होता. पोलिस निरीक्षक बिडवई पुढील तपास करत ( Lalit Patil ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.