Chinchwad : संभाजीनगरमध्ये पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी

एमपीसी न्यूज – एककीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग दिवसाआड पाणीपुरवठा (Chinchwad) करत असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. तीन दिवसापासून चिंचवड, संभाजीनगर येथील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. यामुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, पाईपलाईन फुटली यासंदर्भात ज्याचं नळ कनेक्शन ज्या व्यक्तीच्या नावे आहे त्या व्यक्तीने अथवा महापालिकेने त्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाही.

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे मावळातील पवना धरण यंदा 92 टक्के भरले होते. परंतु,  प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे.  तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवला आहे. उन्हाळा वाढल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे कमी दाबाने, अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीही सातत्याने वाढत आहेत.

PCMC : ‘किलकारी’ योजनेंतर्गत शहरातील 232 गर्भवती महिलांची नोंदणी

आकुर्डी-चिखली रोड अत्यंत वर्दळीचा रस्ता असून दररोज लाखो नागरिक या रस्त्यावरून वाहतूक करत असतात. त्यांच्यापैकी एकही संवेदनशील नागरिक यासाठी पुढे आलेला दिसत नाही. तसेच सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे कुठले संकेत नसल्याने स्थानिक कार्यकर्ते व नेते अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.पाणी बचतीचे नुसते प्रबोधन करून उद्दिष्ट साध्य होणार नाही त्यासाठी छडी म्हणजे कायदा हातात घ्यावा लागेल, जोपर्यंत कायद्याचा धाक निर्माण होत नाही तोपर्यंत अशा घटना दैनंदिन घडत राहणार असे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले यांनी म्हटले (Chinchwad) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.