Chinchwad : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील धोकादायक संरक्षक जाळी हटवली

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर आलेली संरक्षक जाळी अग्निशमन दलाच्या ( Chinchwad)  जवानांनी हटवली. या जाळीमुळे महामार्गावर अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता. 

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 10) सायंकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास शरीफ इकबाल शेख यांनी स्टार्लिंग होंडा शोरूम समोर, चिंचवड स्टेशन येथे महामार्गावर संरक्षक जाळी पडली असल्याची माहिती अग्निशमन विभागाला दिली.

Hinjawadi : नशेत असताना तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणीच्या मानलेल्या भावाने केला खून

त्यानुसार थेरगाव उप अग्निशमन केंद्रातील सिनियर फायरमन मनोज मोरे, फायरमन महेंद्र पाठक, वाहन चालक अक्षय खोल्लम, ट्रेनी सब ऑफिसर विवेक वाघमोडे, ट्रेनी फायरमन रोहित पाटील, गजानन चव्हाण यांनी चिंचवड येथे धाव घेतली. जुन्या महामार्गाच्या बाजूला लावलेली संरक्षक जाळी रस्त्यावर पडली होती. यामुळे महामार्गावरील वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. जवानांनी लोखंडी जाळी कापून बाजूला केली आणि वाहतुकीसाठी रस्ता  ( Chinchwad)  खुला केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.