Pune: भाजपच्या शहर विद्रूपीकरण विरोधात शिवसेनेचा पुणे आयुक्ताना घेराव

एमपीसी न्यूज – लोकसभेचे देशभर बिगूल वाजले, आचारसंहिता सुरु झाली प्रशासनाने (Pune)राजकीय नेत्यांचे बोर्ड झाकले, अनेक बॅनर काढले, पण आज पाच दिवस उलटूनही सत्ताधारी भाजपच्या विरोधात कणभर पण कारवाई झाली नाही, हे प्रशासनाच भाजप साठीच राजकीय वरदान आहे की भीती हा प्रश्न शिवसेना पुणे शहराच्या वतीने करण्यात आला.  
स्वच्छ सर्वेक्षणात तसेच आत्ताच झालेल्या G20 परिषदेत पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून (Pune)शहरातील भिंती सुशोभीकरण केल्या होत्या, परंतु भारतीय जनता पक्षाच्यावतीने या आणि अनेक भिंतींवर  राजकीय जाहिरातबाजी करुन स्वच्छ सर्वेक्षणात पुणेकरांची मान खाली घालविण्याचा प्रकार करुन शहर विद्रुपीकरण केले आहे.
तसेच देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असूनही पुणे मनपा प्रशासन धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे, शहरात सर्रासपणे भाजपने निवडणूक चिन्ह, मोदींच्या घोषणा, भाजप नेत्यांची नावे भिंतींवर लावली आहेत, यातून शहर विद्रूपीकरणात अजुन हातभार लावला जात आहे.
मागील आठवड्यात शिवसेनेच्या वतीने आकाशचिन्ह व परवाना विभागाचे अधिकारी माधव जगताप यांना भेटून निवेदन देऊनही त्यावर आजतागायत कारवाई झालेली दिसत नाही.
या विरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहराच्या वतीने पुणे शहराचे नवनियुक्त आयुक्त यांस आज पुणे महानगर पालिकेत त्यांच्या कार्यालयात घेराव घालण्यात आला .
पुणे मनपा प्रशासने यावर तत्पर कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेला लोकशाहीच्या रक्षणार्थ पुणे मनपा विरोधात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे स्पष्ट सांगण्यात आले.
 आयुक्तांनीही आचारसंहितेची कारवाई चालू केली आहे आणि चुकीचे काम करणाऱ्यांवर आम्ही गुन्हा दाखल करू असे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे,  शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, अविनाश साळवे, विशाल धनवडे, पल्लवी जावळे , संगीता ठोसर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, उपशहर प्रमुख समीर तुपे, आनंद गोयल, प्रशांत राणे, उमेश वाघ, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, युवराज पारीख, गणेश काकडे, विभागप्रमुख अजय परदेशी, राजेश मोरे, राहुल जेकटे व शिवसैनिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.