NCP :  विजय शिवतारे यांनी अजित पवार यांची माफी मागावी, अन्यथा.. राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

एमपीसी न्यूज – बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदरचे शिवसेनेचे माजी  (NCP)आमदार विजय शिवतारे यांच्याकडून महायुतीचा धर्म पाळला जात नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात चुकीची विधाने करत असून त्यांनी अजितदादांची माफी मागावी. अन्यथा आम्ही मावळसह इतर ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचा इशारा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली.

खराळवाडी येथे आज (मंगळवारी) झालेल्या पत्रकार परिषदेला महिला अध्यक्षा कविता आल्हाट, (NCP )माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, गोरक्ष लोखंडे, कार्याध्यक्ष फजल शेख  उपस्थित होते.

विजय शिवतारे हे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. शिवतारे हे अजित पवार यांच्याबाबत बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे.  शिवतारे यांच्या विधानामुळे आम्ही नाराज आहोत. कार्यकर्ते संतप्त आहेत. आमच्या नेत्यांबाबत अतिशय चुकीची विधाने त्यांच्याकडून केली जात आहेत. त्यांच्या विधानामुळे महायुतीला तडा जात आहे.

 

Pune: बारामती – शिरूर लोकसभा निवडणूक अजित पवारांना वाटते तेवढी सोपी नाही

 

शिवतारे यांची अशीच भूमिका राहिली. तर, मावळसह राज्यभरात शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणार आहोत. शिवतारे यांनी अजित पवार यांची माफी मागावी. जोपर्यंत माफी मागत नाहीत. तोपर्यंत आम्ही मावळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत, असा इशारा गव्हाणे यांनी दिला. शिवतारे हे सातत्याने आमचे नेते, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत चुकीची, वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे.  असे नाना काटे म्हणाले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.