Sangvi : आरडाओरडा करणाऱ्यास हटकल्याने मजुरावर चाकूने वार

एमपीसी न्यूज – गल्लीमध्ये आरडाओरडा करून गोंधळ घालणाऱ्या (Sangvi )टोळक्याला हटकल्याने चार जणांनी मिळून एका मजुरावर चाकूने हल्ला केला. तसेच सिमेंटच्या ब्लॉकने डोक्यात, पोटात आणि पायावर मारून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 23) पहाटे पावणेतीन वाजताच्या सुमारास राजीव गांधी नगर पिंपळे गुरव येथे घडली.

संतोष गोपी तलवार (वय 34, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस(Sangvi)ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पवन देवेंद्र बनेटी (रा. पिंपळे गुरव), रोहित साळवे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तलवार हे शनिवारी पहाटे पावणेतीन वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आले होते. त्यावेळी तिथे आरोपी मोठमोठ्याने आरडाओरडा करत गोंधळ घालत होते.

 

Wakad : कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक

त्यामुळे तुम्ही गोंधळ करू नका असे फिर्यादी यांनी सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी तलवार यांना सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्यावर चाकूने वार केले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.