Chikhali : बांधकाम साइटवरून दीड लाखांचा सेंट्रींग माल चोरीला

एमपीसी न्यूज – चार जणांनी मिळून दीड लाख रुपये किमतीचा सेंट्रींगचा माल(Chikhali) चोरून नेला. ही घटना स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन चिखली येथे घडली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवा पांडुरंग पवार (वय 23, रा, लोणावळा), रामदास वाघमारे, अन्सारी, (Chikhali)गणेश कोडंभर (रा. लोणावळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विजय आप्पा गडदे (वय 28, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : अग्रवाल समाजातील महिलांनी राजकारणात उतरावे –  मेधा कुलकर्णी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गडदे यांचा सेंट्रींगचा व्यवसाय आहे. त्यांनी सेंट्रींग कामासाठी लागणारे साहित्य चिखली मधील न्यू चौधरी ढाब्या जवळ एकत्रित करून ठेवले होते. तिथून आरोपींनी एक लाख 52 हजार 60 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.