Nigdi : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करत महिलेची बदनामी; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावरून ओळख झालेल्या मित्राने महिलेकडून 34 तोळे दागिने घेतले. त्यानंतर महिलेसोबत काढलेले फोटो महिलेच्या सोशल मीडियावर व्हायरल करत तिची बदनामी केली. या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार एप्रिल 2023 ते 22 मार्च 2024 या कालावधीत आकुर्डी आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे.

सुरज लक्ष्मण परमार उर्फ सुरज जैन (वय 28, रा. सय्यद नगर, पुणे. मूळ रा. कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी यांची सोशल मीडियावर ओळख झाली. फिर्यादी या हर्बल लाईफ प्रॉडक्टचा व्यवसाय करतात. त्या व्यवसायाच्या निमित्ताने आरोपीने त्यांना भेटून त्यांचा विश्वास संपादन करत बाहेर भेटायला बोलावले.

 

Pune: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार!

 

तिथे आरोपीने महिलेसोबत फोटो काढले. ते फोटो व्हायरल करून समाजात बदनामी करण्याची तसेच पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने महिलेकडून 34 तोळे वजनाचे दागिने घेतले. ते दागिने महिलेला परत देण्यास नकार दिला. तसेच महिलेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दोघांचे फोटो व्हायरल करत महिलेची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.