Pune: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार!

एमपीसी न्यूज – पुणे – नाशिक महामार्गावर जुन्नर तालुक्यातील(Pune ) आळेफाटा बायपास जवळ रात्री 12: 30 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने सहा वर्षाची बिबट्याची मादी जागीच ठार झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच ओतूर विभागाचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांची टीम घटनास्थळी पोचली व या बिबट्याचा मृतदेह माणिकडोह या बिबट निवारण केंद्रात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले.

Pimpri : मोकाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारास शस्त्रासह अटक

नगर-कल्याण महामार्ग व पुणे-नाशिक महामार्ग या ठिकाणी वाहनांच्या धडकेने बिबटे ठार होण्याचे प्रमाण वाढले आहे. वन विभागाने वाहने सावकाश चालवा, या ठिकाणी बिबट्या रस्ता ओलांडत आहे ,अशा प्रकारचे फलक देखील लावलेले आहेत. परंतु रात्रीच्या वेळी रस्ता मोकळा असल्यामुळे वाहनांचा वेग जास्त असतो आणि बिबट्याला वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे धडकेमुळे बिबट्यांचे मृत्यू होत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.