Pimpri :  दोन महिन्यात 50 हरवलेल्या मोबाईलचा शोध

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी दोन महिन्याच्या कालावधीत 50 हरवलेल्या(Pimpri) मोबाईल फोनचा शोध घेतला आहे. हे मोबाईल फोन महाराष्ट्रासह इतर राज्यातून हस्तगत करण्यात आले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी आणि फेब्रुवारी (Pimpri)या दोन महिन्यात सीईआयआर या पोर्टलच्या माध्यमातून परराज्यातून 15 आणि राज्यभरातून 35 मोबाईल फोन हस्तगत करण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे. बिहार, कर्नाटक, मालदा पश्चिम बंगाल, ओरिसा, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र येथून हे मोबाईल फोन जप्त केले आहेत.

 

Pimpri : मोकाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारास शस्त्रासह अटक

पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शहाजी धायगुडे आणि दत्तात्रय निकम यांनी मागील वर्षभरात तब्बल 250 पेक्षा अधिक मोबाईल फोन जप्त केले होते.

धायगुडे आणि निकम यांनी बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यात देखील चांगली कामगिरी केली आहे. एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत 212 बेपत्ता व्यक्तींना शोधण्यात आले आहे. मंगलोर, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून या नागरिकांचा शोध घेण्यात आला आहे.

सन 2022-23 या वर्षांत निकम आणि धायगुडे यांनी 365 दिवसात 365 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला होता. तसेच गहाळ झालेले 300 मोबाईल फोन हस्तगत केले होते. त्याबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दोघांचा सत्कार केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.