Pimpri : मोक्काच्या गुन्ह्यातील गुन्हेगारास शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज – मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला(Pimpri)पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक धारदार शस्त्र, एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

कृष्णा उर्फ बॉक्सर बाळू पारधे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाच्या (Pimpri)प्रयत्नाच्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये केलेल्या कारवाई मध्ये आरोपी कृष्णा उर्फ बॉक्सर पारधे हा फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात होता.

पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शहाजी धायगुडे आणि दत्तात्रय निकम यांना माहिती मिळाली की, मोका मधील आरोपी कृष्णा हा मोहननगर येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. पोलीस आपल्या मागावर आहेत, याची चाहूल लागताच आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक धारदार शस्त्र, एक गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली.

Chinchwad : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून महिलेची केली आर्थिक फसवणूक ; फसवणुकीचे धागेदोरे बँकॉकपर्यंत

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिगंबर अतिग्रे, उपनिरीक्षक शाकीर जिनेडी, पोलीस अंमलदार दत्तात्रय निकम, शहाजी धायगुडे, दीपक महाजन, नूतन कोंडे यांनी केली आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.