Talegaon Dabhade : श्री संत गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील श्री संत गोरोबाकाका सेवा मंदीर,कुंभारवाडा येथे ( Talegaon Dabhade)  श्री संत गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम सोमवार (दि.6) रोजी आयोजित केला होता. त्यानिमित्त सकाळी 7 वाजता श्रींचा महाभिषेक व महापुजा नामदेव दरेकर यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर सकाळी 8 वा. संतोष दगडू कुंभार (अध्यक्ष पुणे जिल्हा कुंभार समाजोन्नती मंडळ, पुणे) सुहास बळीराम गरुड (मा. सभापती शिक्षण मंडळ, त दा न प) श्री केदार गोरख भेगडे (मा. अध्यक्ष डोळसनाथ महाराज उत्सव समिती)

हभप श्री शिवाजी महाराज सुतार ( मृदुंगाचार्य )या मान्यवरांच्या हस्ते गोरोबा काकांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.

सकाळी 11 ते 12 या दरम्यान संत गोरोबाकाकांच्या पुण्यस्मरणानिमित्त हभप पांडुरंग कार्लेकर गुरुजी यांची प्रवचन रुपी सेवा पार पडली. दुपारी 3 वा. हभप बाळकृष्ण मारुती आरडे (विश्वस्त विठ्ठल मंदिर  ) यांच्या हस्ते पालखी पूजन संपन्न झाले.

Maval : बारणे यांना मित्र पक्षासह मतदार स्वीकारायला तयार नाहीत – माऊली दाभाडे

दुपारी 3  ते 5 यावेळेत भजन व नामघोषाच्या गजरात संत गोरोबाकाकांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा झाली.सायं 6 वा. मा नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. सायं 6 ते 8 या दरम्यान हभप उद्धव महाराज अटाळीकर यांचे सुश्राव्य अ कीर्तन झाले. व त्यानंतर 8 वा. महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातून असंख्य कुंभार समाज बांधव उपस्थित होते. तसेच तळेगावातील आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, राजकीय, धार्मिक,वारकरी संप्रदायातील विविध मान्यवर उपस्थित ( Talegaon Dabhade)  होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.