Alandi : मद्यपी वाहन चालकाची वाहतूक पोलिसांशी हुज्जत

एमपीसी न्यूज – वाहतुकीचे नियमन आणि वाहतुकीचे नियमभंग ( Alandi ) करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांना दररोज अनेकदा वाहन चालकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करताना अनेकवेळा वाहतूक पोलिसांना त्यांच्याशी हुज्जत घालावी लागते. आळंदी येथे रविवारी (दि. 24) चाकण चौकात एका मद्यपी वाहन चालकाने वाहतूक पोलीसासोबत हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

रामेश्वर नारायण भाळे (वय 33, रा. चिखली) असे हुज्जत घालणाऱ्या वाहन चालकाचे नाव आहे.

Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचे लाभार्थी संपर्क अभियान

याबाबत माहिती अशी की, दिघी-आळंदी वाहतूक विभागात नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार अरुण गर्जे रविवारी सकाळी आळंदी शहरातील चाकण चौकात वाहतूक नियमन करत होते. होळीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मद्यपी वाहन चालकांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने अशा संशयित वाहन चालकांवर गर्जे तपासणी करून कारवाई करीत होते.

घुंडरे आळी कॉर्नरवर एक टेम्पो आला असता चालकावर संशय आल्याने पोलीस अंमलदार गर्जे यांनी टेम्पो थांबवला. ब्रेथ अॅनालायजर मशिनद्वारे चालकाची तपासणी केली. त्यामध्ये चालक रामेश्वर भाळे हा मद्य प्राशन केल्याचे आढळून आले. वाहतूक पोलिसांनी भाळे याच्याकडे चौकशी केली असता त्याने थेट पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

याप्रकरणी वाहन चालक भाळे याच्यावर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत न्यायालयात खटला दाखल केला जाणार असल्याचे ( Alandi ) वाहतूक पोलिसांनी सांगितले.

 

https://www.youtube.com/watch?v=lST7LUQdN7g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.