Chakan Market :कांद्याची आवक वाढूनही भाव वधारले; हिरवी मिरची, कैरी व लसणाच्या दरात वाढ

काल दि.(5 मे) रोजी चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड येथे एकूण उलाढाल 5 कोटी,10 लाख रुपयांची

एमपीसी न्यूज: काल  दि. (5 मे) रोजी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड येथे  हिरवी मिरची,कांदा,तोतापुरी कैरी व लसणाचे भाव कडाडले आहेत. कांद्याची भरपूर आवक होवूनही भावात वाढ झाली. बटाट्याची आवक व भाव स्थिर राहिले. फळभाज्यांच्या बाजारा कोबी, हिरवी मिरची, वाटाणा, गाजर व शेवग्याच्या भावात(Chakan Market) वाढ झाली.

तसेच,पालेभाज्यांच्या बाजारात मेथीची आवक वाढूनही भाव तेजीत राहिले. कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची आवक घटल्याने भावात वाढ झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल व म्हैस यांच्या संख्येत घट होवूनही भाव स्थिर राहिले. शेळ्या – मेंढ्याच्या संख्येत मोठी वाढ झाली. एकूण उलाढाल 5 कोटी, 10 लाख रुपये (Chakan Market) झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 2 हजार 600 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 100 क्विंटलने वाढून भावात  500 रुपयांची उच्चांकी वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 1500 रुपयांवरून 2 हजार रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक 1350 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून बटाट्याचा कमाल भावही 2500 रुपयांवरच स्थिरावला. बंदूक भूईमुग शेंगा व जळगाव भुईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही.

लसणाची एकूण आवक 25 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 3 क्विंटलने घटली व भावात 1 हजार रुपयांची वाढ झाली. लसणाचा कमाल भाव 14 हजार रुपयांवरून 15 हजार रुपयांवर पोहोचला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 375 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 55 क्विंटलने घटली. हिरव्या मिरचीला 4 हजार रुपयांपासून ते 6 हजार रुपयांपर्यंत(Chakan Market) भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –
कांदा – एकूण आवक – 2600 क्विंटल. भाव क्रमांक- 1. 2000 रुपये, भाव क्रमांक-2. 1500 रुपये, भाव क्रमांक-3. 1300 रुपये.
बटाटा – एकूण आवक -1350 क्विंटल. भाव क्रमांक-1. 2500 रुपये, भाव क्रमांक- 2. 2200 रुपये, भाव क्रमांक- 3. 1800 रुपये.
 

फळभाज्या –

फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे –

टोमॅटो – 290 क्विंटल ( 1000 ते 1500 रू. ),

कोबी – 160 क्विंटल ( 1000 ते 1800 रू.),

फ्लॉवर – 170 क्विंटल ( 2000 ते 2600 रु.),

वांगी – 70  क्विंटल ( 2500 ते 3500 रु.),

भेंडी – 76 क्विंटल ( 3500 ते 4000 रु.),

दोडका – 48 क्विंटल ( 4000 ते 5000 रु.),

कारली – 62 क्विंटल ( 4000 ते 5000 रु.),

दुधीभोपळा – 54 क्विंटल (1000 ते 2000 रु.),

काकडी – 80 क्विंटल ( 1000 ते 2000 रु.),

फरशी – 24 क्विंटल ( 10000 ते 12000 रु.),

वालवड – 48 क्विंटल ( 5000 ते 7000 रुपये),

गवार – 52 क्विंटल ( 3000 ते 5000 रुपये, ),

ढोबळी मिरची – 156 क्विंटल ( 4000 ते 6000 रु.),

चवळी – 42 क्विंटल ( 3000 ते 4000 रु.),

वाटाणा – 50 क्विंटल ( 8000 ते 10000 रु.),

शेवगा – 53 क्विंटल ( 2000 ते 2500 रु.),

गाजर – 100 क्विंटल ( 2000 ते 3000 रु.),.

 

पालेभाज्या –  

चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे –

मेथी – एकूण 12 हजार 500 जुड्या ( 1500 ते 2000 रुपये,),

कोथिंबीर – एकूण 19 हजार 600 जुड्या ( 1500 ते 2500 रुपये,),

शेपू – एकूण 2 हजार 400 जुड्या ( 1000 ते 1500 रुपये ),

पालक – एकूण 3 हजार 200 जुड्या ( 800 ते 1000 रुपये)

 

जनावरे –

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या जनावरांच्या विक्रीचा तपशील पुढीलप्रमाणे –

35 जर्शी गाईपैकी 27 गाईची विक्री झाली. ( 10000 ते 40000 रु.),

65 बैलांपैकी 42  बैलांची विक्री झाली. ( 10000 ते 40000 रु.),

110 म्हशीपैकी 80 म्हशींची विक्री झाली.( 20000 ते 80000 रु.),

12 हजार 350 शेळ्या – मेंढ्यापैकी 12220 शेळ्यांची विक्री झाली. ( 2000  ते 15000 रु.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.