Wakad : कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज – कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने एक व्यक्तीने नागरिकांची (Wakad)आर्थिक फसवणूक केली. ही घटना एक मे 2021 ते 23 मार्च 2024 या कालावधीत वाकड येथे घडली.

दादाराव किसन कांबळे (वय 48, रा. आनंदनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल (Wakad)झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pune : अग्रवाल समाजातील महिलांनी राजकारणात उतरावे –  मेधा कुलकर्णी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दादाराव कांबळे यांनी फिर्यादी महिला आणि त्यांच्या ओळखीच्या अन्य लोकांना कर्ज काढून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले. पैसे घेऊन त्यांना कर्ज न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. फिर्यादी यांच्यासह इतर नागरिकांची एकूण तीन ते चार लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.