Chikhali : माजी सैनिकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पाण्याचा पाईप कोणी फोडला याबाबत विचारणा केली (Chikhali )असता सात जणांनी मिळून माजी सैनिकाला आणि त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच माजी सैनिकावर कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी रुपीनगर तळवडे येथे घडली.

अशोक रामकिशन कानडे (वय 48, रा. रुपीनगर, तळवडे) असे जखमी माजी सैनिकाचे(Chikhali )नाव आहे. त्यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार महिला आणि इतर तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali : बांधकाम साइटवरून दीड लाखांचा सेंट्रींग माल चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक कानडे आणि आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहण्यास आहेत. कानडे यांच्या घराचा पाण्याचा पाईप अज्ञात व्यक्तीने फोडला. त्याबाबत त्यांनी शेजारी राहणाऱ्या महिलेला विचारणा केली. त्या कारणावरून आरोपींनी कानडे, त्यांच्या पत्नी व मुलाला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच कानडे यांच्या डोक्यात कोयत्याने मारून त्यांना गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.