Dehuroad : भरधाव दुचाकीचा अपघात; तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव दुचाकी निष्काळजीपणे चालवल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक जखमी झाला आहे. ही घटना 13 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावर देहूरोड येथे घडली.

 

सूर्य प्रताप (वय 20) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे(Dehuroad) नाव आहे. याप्रकरणी ललित कुमार (वय 19, रा. देहूरोड) यांनी शनिवारी (दि. 27) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार असीम (पूर्ण नाव माहिती नाही, वय 24, रा. मामुर्डी देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Talegaon : मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,असीम आणि फिर्यादी यांचा मित्र सूर्य प्रताप हे दुचाकीवरून सेंट्रल चौक देहूरोड येथून मुकाई चौकाकडे जात होते.ते देहूरोड येथील ईदगाह मस्जिद समोर आले असता असीम याने निष्काळजीपणे भरधाव दुचाकी(Dehuroad) चालवली. त्यामुळे दुचाकीचा अपघात झाला. त्यात सूर्य प्रताप याचा मृत्यू झाला असून असीम जखमी झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.