PCMC : महापालिकेतील सहा अधिका-यांना बढत्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सहा अधिका-यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता म्हणून कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे आणि विजयकुमार काळे यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली आहे. राणे यांच्याकडे पाणीपुरवठा विभाग आणि काळे यांच्याकडे झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन स्थापत्य, पंतप्रधान आवास विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी व झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांना उपायुक्त म्हणून पदोन्नती दिली आहे. ई क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त राजेश आगळे यांनाही उपायुक्त म्हणून पदोन्नती दिली आहे. झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप आणि भूमी व जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप यांची सहायक आयुक्त म्हणून पदोन्नती केली आहे. मात्र, दोन्ही उपायुक्तांना आहे तेच विभाग कायम ठेवले आहेत.

Alandi : सिद्धबेटात बांबू वृक्षांच्या परिसरात आग

पदोन्नतीचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी (PCMC) जारी केले आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पूजा दुधनाळे या महापालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून रूजू झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.