Chinchwad : हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या संपूर्ण संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज – जम्मू कश्मीर येथे  22 ते 24 मार्च रोजी (Chinchwad)  एरोबिक जिम्नास्टीक या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पिंपरी चिंचवड जिल्हा जिम्नास्टीक संघटने तर्फे नऊ खेळाडूंची निवड झाली आहे.या विशेष समारंभाच्या निमित्ताने हेवन जिम्नास्टीक अकॅडमी तर्फे या 9 खेळाडूंचा व हर्षद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे WHO आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक विकास गटाचे समिती सदस्य जॉर्ज मकासरे हे तज्ञ लाभले. त्या बरोबरीने पिंपरी चिंचवड जिल्हा जिम्नास्टीक संघटनेचे सचिव संजय शेलार,राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक मनोज काळे,हॅपी इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक राजेंद्र पिंपळे,आहार तज्ञ गौरी शिंगटे,संघटनेच्या खजिनदार श्रद्धा शेलार व आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रशिक्षक अलका तापकीर यांनी बघितले,सुत्रसंचालन प्रशिक्षक चैतन्य कुलकर्णी यांनी केले.खेळाडूंनची माहिती व आभार प्रदर्शन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांनी केले. सर्व पाहुण्यांनचा सत्कार खेळाडूंच्या पालकांनी केला.खेळाडूंच्या सादरीकरणाने संपूर्ण कार्यक्रमात उर्जा निर्माण झाली होती.मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती होती.

 

याच 9 खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड तर्फे सहभाग नोंदवला (Chinchwad) होता.त्याचबरोबरी ने सदर राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक म्हणून पदी निवड झालेली आहे.

खेळाडूंची नावे खालील प्रमाणे

वृंदा सुतार

17 वर्षाखालील गट,वैयक्तिक महिला प्रकार

परीजा क्षीरसागर

14 वर्षाखालील गट,वैयक्तिक महिला प्रकार

अनवी पाटील

तिहेरी प्रकार

सानवी पाटील, धानी पटेल,ईश्वरी कंठागळे

11 वर्षाखालील गट,वैयक्तिक महिला प्रकार

राहि फुलतांबकर

तिहेरी प्रकार

सिद्धी मारे,गितीका चौधरी,राही फुलतांबकर.

https://www.youtube.com/watch?v=AhYwtbONGh8

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.