Pune : दिव्यांग मुलांनी केले रामरक्षा पठण

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, कोथरूड(Pune) शाखेच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. सावली या दिव्यांग मुलांच्या संस्थेतील दिव्यांग मुलांनी रामरक्षा पठण केले.

 

यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने मंदार रेडे, केतकी कुलकर्णी, माधव तिळगूळकर,अनिरुद्ध पळशीकर, डॉ अरुण जोशी, विवेक खिरवडकर, दयाकर दाबके, चित्रा जोशी, मंजुषा खिरवडकर, माधवी कुंटे उपस्थित होते. तसेच सावली संस्थेकडून वसंत ठकार, प्रवीण छाजेड, मयुरी कुलकर्णी, गिरीश आमडेकर व सर्व कर्मचारी (Pune) सहभागी झाले होते.

Alandi : स्वतः तरतात आणि इतरांना तारतात त्यांना तीर्थंकर म्हणतात – जैन साधू प्रशांत ऋषीजी

मुलांनी रामरक्षा, भीमरूपी, संगीत तालावर रचलेली भजने म्हणून उपस्थितांची दाद मिळवली. अजित कुंटे या मुलाने श्रीराम गीत म्हणून उपस्थितांची मने जिंकली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने सुमारे सहा महिने पुरेल एवढे धान्य व फळे एक कर्तव्य म्हणून संस्थेला मदत स्वरूपात देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.