Nigdi : पेट्रोल भरल्याचे पैसे मागितल्याने कामगाराला मारहाण

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका कामगाराने एका दुचाकीत पेट्रोल भरल्याचे पैसे मागितले. त्यावरून दुचाकीवरील दोघांनी कामगाराला(Nigdi) मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी साडेसात वाजता श्री बालाजी पेट्रोल पंप, निगडी येथे घडली.

अथर्व महेश शिंदे (रा. कात्रज, पुणे), गौतम परशुराम कांबळे (रा. बिजलीनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रवींद्र शिवबहादूर सिंग (वय 51, रा. दत्तनगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wakad : दहा जणांच्या टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र शिवबहादूर सिंग हे निगडी येथील श्री बालाजी पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांचा कामगार चंद्रशेखर यादव याने एका दुचाकीमध्ये 100 रुपयांचे (Nigdi) पेट्रोल भरले. त्यानंतर त्याचे पैसे त्याने दुचाकीस्वाराकडे मागितले. दुचाकीस्वाराने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे सिंग तिथे गेले असता दुचाकीवरील दोघांनी सिंग यांना दगड फेकून मारत जखमी केले. त्यानंतर आरोपी तुला बघून घेतो,अशी धमकी देऊन निघून गेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.