Nigdi : कोयत्यासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज –   निगडी येथून एका तरुणाला कोयत्यासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट- 2 पथकाने मंगळवारी (दि.16) निगडी येथील शंकर मंदिराजवळ करण्यात आली आहे.

 

क्रिस्टोफर आल्विन सालढाणा (वय 19 रा. निगडी) असे अटक आरोपीचे नाव असून याप्रकरणी  पोलीस कॉन्स्टेबल उद्धव खेउकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Nigdi : कोयता घेऊन घरातील सामानाची तोडफोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हा बेकायदेशीररित्या कोयता घेवून (Nigdi) फिरत होता. गुन्हे शाखेला याची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून 200 रुपयांचा कोयता जप्त केला. याप्रकरणी  निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.