Indapur : निधी भरपूर पाहिजे असेल तर आमच्या उमेदवाराला मतदान करा – अजित पवार

एमपीसी न्यूज – बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर येथे वकील आणि डॉक्टरांचा मेळावा आज (दि. 17 एप्रिल) रोजी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात (Indapur) उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वकील आणि व्यापारी संवाद साधला.

            

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पक्षांचे नेते व्यापारी, वृद्ध नागरिक,डॉक्टर्स अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी विविध ठिकाणी जाऊन संवाद साधत असतात. आज राम नवमीच्या शुभ दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील व्यापारी वर्ग आणि वकील बांधवांशी संवाद साधला.

Indapur: त्यांनी आमचं नाव घेतलं की चांगली वागणूक द्या, दुसऱ्यांच नाव घेताच इंजेक्शन द्या; अजित पवारांच्या वक्तव्याने एकच हशा

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित दादा यांनी आपल्या मिश्कील शैलीत म्हणाले, आपल्या भागाला निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही मात्र तुम्ही मतदान करायला गेल्यावर मशीनमध्ये देखील आपल्या उमेदवाराच्या समोरचे बटन दाबा म्हणजे आम्हाला पण निधी द्यायला बरे वाटेन नाहीतर मला पण निधी देताना हात आखडता घ्यावा लागेल असे म्हणत उपस्थितांच्या चेहऱ्यावर हशा पिकवला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.