Indapur: त्यांनी आमचं नाव घेतलं की चांगली वागणूक द्या, दुसऱ्यांच नाव घेताच इंजेक्शन द्या; अजित पवारांच्या वक्तव्याने एकच हशा

एमपीसी न्यूज – इंदापुर येथे वकील आणि डॉक्टरां चा मेळावा (Indapur)आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वकील आणि डॉक्टरांची संवाद साधलाय आहे.

यावेळी अजित पवारांनी डॉक्टरांना हसत हसत एक सल्ला दिला आहे.

तुमच्याकडे अनेक रुग्ण येतात आणि रुग्ण हा डॉक्टरांशीच खरे (Indapur)बोलतो. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती योग्य उपचार करता. हे करत असताना जरा आमचं विचारा.. चाचपणी करा ..कसं काय जर त्यांनी आमचं नाव सांगितलं तर चांगली वागणूक द्या आणि दुसर नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा.

Loksabha election : निवडणुकीत पैशाच्या प्रलोभने दाखवणे आचारसंहितेचा भंग नाही का?

असं म्हणताच सर्वत्र एकच हशा पिकली होती. त्यावर अजित पवारांनी सावरून घेत सॉरी, माफ करा असे म्हणाले.

याच मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांना त्यांच्या घरातले पवार आणि बाहेरचे पवार वेगळे, या वक्तव्यावर सुनावलं. या मेळाव्यात अजित पवारांनी डॉक्टर महिलेचं नाव घेऊन तुम्ही सून म्हणून आला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात’, असं म्हणत शरद पवारांवर निशाणा साधलाय.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.