Loksabha election : निवडणुकीत पैशाचे प्रलोभने दाखवणे आचारसंहितेचा भंग नाही का?

डॉ.अमोल कोल्हे यांचा अजित पवार यांना सवाल

एमपीसी न्यूज : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या इंदापूर येथे व्यापाऱ्यांच्या सभेत आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊन पण तुम्ही मशिनचे बटन दाबा असं विधान केल्यानंतर अमोल कोल्हेंनी अजित पवारांना थेट सुनावले.

Alandi: देशात 73 टक्के सुशिक्षित बेरोजगार-डॉ.अमोल कोल्हे

डॉ. कोल्हे म्हणाले की, निधीचे पैसे मायबाप जनतेचे आहे त्यामुळे निवडणूकीसाठी जनतेच्या कररूपातून गोळा केलेल्या पैशाची प्रलोभने दाखवणे आचारसंहितेचा भंग नाही का? असा प्रश्न अजितदादांना उपस्थित केला आहे. तसेच सरकारी निधीचे  वाटप  करून एखादा रस्ता होईल, पण शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणं गरजेचे आहे. महागाईपासून त्याची सुटका होणं गरजेचे  असून  रोजगार निर्माण होणं महत्त्वाचे आहे.

तसेच,बेरोजगारी कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे. जनतेच्या पैशातला निधी देऊन या धोरणांमध्ये दुरुस्ती होत नाही  म्हणून  जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना सुनावले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.