Marunji :ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने महिलेची तीन लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – महिलेला पार्ट टाईम जॉब सांगून ऑनलाईन टास्क देत तीन लाख रुपयांची फसवणूक (Marunji) केली आहे. ही फसवणूक 26 मार्च 2024 रोजी मारुंजी येथे घडली आहे.

 

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.16) महिलेने फिर्याद दिली असून हिंजवडी पोलीस यांनी  फिर्यादीच्या सांगण्यावरूनअनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून ऑनलाईन टास्क देत 12 टास्क पूर्ण करवून घेतले. यात फिर्यादीकडून वेळोवेळी एकूण 2 लाख  92 हजार रुपये घेतले व  ते पैसे परत न देता फिर्यादीची (Marunji) फसवणूक केली आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.