Nigdi : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – गुटखा विक्री प्रकरणी पिंपरी चिंचवड (Nigdi) गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी रामदेव हॉटेल, आकुर्डी येथे करण्यात आली.

अचलराम फगाराम देवासी (वय 43, रा. आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रवीण माने यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wakad : गांजा विक्री प्रकरणी महिलेला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवासी याने त्याच्या ताब्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर (Nigdi) दरोडा विरोधी पथकाने देवासी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 16 हजार 222 रुपये किमतीचा तंबाखूजन्य गुटखा जप्त करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.