Pune : माळशेज घाटात एसटी- ट्रकचा भीषण अपघात, ट्रक महामार्गावर उलटला

सुदैवाने अपघातात जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज  –  शुक्रवारी मध्यरात्री एसटी बस आणि ट्रकची  ( Pune) समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होती की अपघातानंतर ट्रक जागीच पलटी झाला. तसेच अपघातामध्ये एसटी बसचे मोठे नुकसान झाले.

कल्याण महामार्गावर माळशेज घाटात काल शुक्रवारी रात्री साधारण 11.30 चा सुमारास हा अपघात झाला आहे. एसटी आणि ट्रकची धडक एवढी भीषण होती की, ट्रक जागीच पलटी झाला . कल्याण – शिरोली बस ही शिरोली येथे मुक्कामी येत होती. कल्याणवरून जुन्नरच्या दिशेने ही बस येत होती तर ट्रक कल्याणच्या दिशेने जात होता. अपघाताप्रसंगी ट्रक आणि बस हे दोन्ही वाहने समोरासमोर आले आणि हा अपघात झाला.

Maharashtra : संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजनेसाठी 1 हजार 496 कोटी निधी वितरित

बसमधील प्रवासी झोपेत होते. जोरदार धक्क्यानंतर सर्वच जण घाबरले. या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना आळे फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले ( Pune) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.