World Cup 2023 : पाकिस्तानचा नेदरलँड वर 81 धावांनी विजय

एमपीसी न्यूज – वर्ल्डकपच्या दुसऱ्या सामन्यात आज पाकिस्तानने (World Cup 2023)  नेदरलँडला 81 धावांनी नमवत वर्ल्डकपच्या प्रवासाला विजयाने सुरुवात केली. पाकिस्तानच्या प्रभावी गोलंदाजीपुढे नेदरलँडची फलंदाजी ढेपाळली.

नेदरलँडने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाकिस्तानच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशजनक झाली. सलामी फलंदाज फकर जमान हा चौथ्या षटकात बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार बाबर आझम (World Cup 2023)  हा देखील 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर पाकिस्तानची स्थिती 3 बाद 38 धावा अशी होती.

चौथ्या क्रमांकावर आलेल्या मोहमंद रीजावान 68 याने   शकील 68 याच्या सोबतीने शतकी भागीदारी रचली. आणि पाकिस्तानचा संघ सुस्थितीत पोहचला. त्यानंतर मोहमद नवाज 39 आणि शादाब खान 32 यांनी खालच्या फळीत महत्वाचे योगदान दिले. तथापि पाकिस्तानचा संघ पूर्ण 50 षटके खेळू शकला नाही. त्यांनी 49 षटकात सर्वबाद 286 अशी धावसंख्या उभारली.  नेदरलँडच्या गोलंदाजांनी यावेळी पाकिस्तानला  ऑलआउट केले.

Pune : माळशेज घाटात एसटी- ट्रकचा भीषण अपघात, ट्रक महामार्गावर उलटला

हैद्राबादच्या संथ खेळपट्टीवर 286 धावा हे आव्हानात्मक लक्ष्य ठरणार होते. पाकिस्तानच्या बेडक गोलंदाजी समोर सुरुवातीपासुनच नेदरलँडने गडी गमावले.  नेदरलँडकडून  विक्रमजीत सिंह 52, बस डे लीड 67 यांनी अर्धशतकी खेळी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. तथापि, लोगन वन बीक 28 सोडता कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. नेदरलँडचा डाव 41 षटकात 205 धावांवर आटोपला.

पाकिस्तानी गोलंदाज हरीस रौफ याने 9 षटकात 43 धावा देत 3 बळी मिळवले. तर हसन आली याने 7 षटकात 33 धावा देत 2 गडी बाद केले. तसेच शाहीन आफ्रिदी, इफ्त्कार, मोहमद नवाज आणि शादाब खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यामध्ये दोन्ही संघाचे मिळून 20 गाडी बाद झाले. पाकिस्तानी फलंदाज सौद शकील हा सामनावीर (World Cup 2023)  ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.