Maharashtra : संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजनेसाठी 1 हजार 496 कोटी निधी वितरित

एमपीसी न्यूज – संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य (Maharashtra) निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थींना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत 556 कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत 940  कोटी रुपये असा एकूण 1496 कोटी रुपये इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सामाजिक न्यांय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरित करण्यात आला असून लाभार्थींना तो तत्काळ वाटप करावा अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सर्व जिल्हाधिकान्यांना दिल्या आहेत.

Pune : पुण्यात बंदी असलेल्या गोव्यातील दारूचा मोठा साठा जप्त

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत किमान 18  ते 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत: चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहित स्त्री. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.

या योजनेमध्ये दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा 21 हजार रुपये पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अंसणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थींना 1500 रुपये दरमहा अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रयरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व 21 हजार रुपये पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या 65  व 65 वर्षावरील पात्र लाभार्थीस दरमहा 1500  रुपये अर्थसहाय्य देण्यात येते.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनांचे स्वरुप विचारात घेऊन या पुढील काळात योजनेतील लाभार्थीना तातडीने अर्थसहाय्य वितरीत होण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही सचिव  भांगे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना (Maharashtra) दिल्या आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.