Pune Crime News : मेडिकल बिल मंजुरीसाठी लाच मागणारा उपविभागीय अभियंता एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – मेडीकल बिल मंजुरीसाठी पाच हजार रूपयांची लाच मागणारा उपविभागीय अभियंता लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. तसेच यासाठी प्रोत्साहन देणा-या एका इसमाला देखील ताब्यात घेतले आहे. पळसदेव, ता. इंदापूर याठिकाणी आज (सोमवारी, दि. 9) हा प्रकार घडला.

संजय नारायण मेटे (उपविभागीय अभियंता, वर्ग-2, भीमा उपसा सिंचन प्रकल्प, पळसदेव, ता. इंदापूर) असे या अभियंत्याचे नाव आहे. तसेच, पोपट दशरथ शिंदे (रा. बारामती) असे दुस-या इसमाचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मेडीकल बिल मंजूरीसाठी तक्रारदाराकडे पाच हजार रूपयांची लाच मागितली. एसीबीला प्राप्त तक्रारीवरून विभागाने 2 ऑगस्ट रोजी याबाबत पडताळणी केली व आज (सोमवारी, दि. 9) सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले. याबाबत बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भारत सांळुखे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.