Metro : गणेशोत्सावात मेट्रो धावली सुसाट; 63 लाखांचे उत्पन्न

4 लाख जणांनी केला प्रवास, 63 लाख 23 हजार 718 रुपयांचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – गणेशोत्सावात मेट्रो सुसाट धावली. देखावे पाहण्यास जाण्याकरिता (Metro) पिंपरी-चिंचवडकरांनी  मेट्रो प्रवासाला पसंती दिल्याचे दिसून येते. 4 लाख 5 हजार 280 जणांनी गणेशोत्सवातील दहा दिवसांत मेट्रोने प्रवास केला. त्यातून महामेट्रोला 63 लाख 23 हजार 718 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

गणेशोत्साव मेट्रोची वेळ वाढविण्यात आली होती. रात्री 12 बाजेवापर्यंत मेट्रो सुरु होती. पुण्यातील देखावे पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिल्याचे दिसून आले. ऑगस्टमध्ये 21 लाख 16 हजार 772 नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यातून 3 कोटी 25 लाख 88 हजार 900 रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर, सप्टेंबर महिन्यात (28 तारखेपर्यंत) 19 लाख 13 हजार 227 नागरिकांनी प्रवास केला. त्यातून 2 कोटी 81 लाख 89 हजार 760 रुपयांचे उत्पन्न मिळाले.

ऑगस्ट महिन्यात 15 तारखेला सर्वात जास्त 1 लाख 69 हजार 512 नागरिकांनी प्रवास केला. तर 30 लाख 63 हजार 350 रुपयांचे उत्पन्न मिळाले. सप्टेंबर महिन्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारी (दि.28) सर्वात जास्त 1 लाख 63 हजार 227 नागरिकांनी प्रवास केला. तर, 25 लाख 48 हजार 384 रुपयांचे उत्पन्न मिळाले. एक ऑगस्टपासून मेट्रो पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते रुबी हॉल क्लिनिक आणि वनाजपर्यंत धावत आहे.

Vadgaon Maval : राष्ट्रवादी शरद पवार गट ओबीसी सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अतुल राऊत यांची निवड

तेव्हापासून महापालिका भवन स्टेशन (Metro) ते सिव्हिल कोर्ट स्टेशन या मार्गावर 16 लाख 89 हजार 858 जणांनी प्रवास केला. त्यातून 2 कोटी 67 लाख 44 हजार 304 रुपयांचे उत्पन्न मिळाले. वनाज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक स्टेशन मार्गावर 22 लाख 74 हजार 197 नागरिकांनी प्रवास केला. त्या माध्यमातून एकूण 3 कोटी 22 लाख 42 हजार 665 रुपयांचे उत्पन्न मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.