Vadgaon Maval : शिवराज हॉटेलच्या रावणथाळीची ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंद; एकाच थाळीत मिळतात 32 नॉन व्हेज डिश

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील शिवराज हॉटेलचा (Vadgaon Maval) नावलौकिक महाराष्ट्रासह अवघ्या देश पातळीवर झाला आहे. चविष्ट मांसाहारासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवराज हॉटेल मधील प्रत्येक पदार्थासाठी खमंग, रुचकर, झणझणीत अशा विविध बिरुदावल्यांची दाद ग्राहकांकडून दिल्या जातात. आपल्या प्रामाणिक चवीच्या जोरावर आयएसओ मानांकन मिळवलेल्या शिवराज हॉटेलने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. बुधवारी (दि. 29) हॉटेल शिवराजच्या प्रसिध्द रावणथाळीने वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’ मध्ये सर्वात जास्त डिशेससाठी विक्रम नोंदविला आहे.

वडगाव मावळ येथील आयएसओ मानांकन प्राप्त हॉटेल

शिवराजच्या बकासूर, कडकनाथ, तसेच रावणथाळी (Vadgaon Maval) अशा विविध प्रसिद्ध थाळी खवय्यांच्या पसंदीस उतरत असताना आता रावण थाळीचे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे.स्पेशल रावण थाळी, बकासूर, कडकनाथ थाळी, सरकार मटण थाळी, पैलवान मटण थाळी, मालवणी फिश थाळी या स्पेशल थाळ्यांनी येथे येणा-याचे स्वागत केले जाते.

Cricket : राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक पदी कायम; बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा

या हॉटेलची स्पेशालिटी असणाऱ्या पैलवान थाळीमध्ये दोनजण, सरकार थाळीमध्ये पाच ते सहाजण, बकासूर कडकनाथ थाळीमध्ये पाच ते सहा व मालवणी फिश थाळीत दोन ते तीन लोकांचे पोट भरून जेवण होत असल्याने युवकांची या शिवराज स्पेशल मोठ-मोठ्या थाळ्यांना खूप पसंती मिळत आहे. वेगवेगळ्या सणांमध्ये व सुट्टीच्या काळात हॉटेलमध्ये आकर्षक सवलत दिली जाते. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या नावांच्या या थाळ्या समोर आल्यावर पहिल्यांदा त्या बघूनच आपण तृप्त होतो. त्यात त्यांची चव घ्यायला सुरुवात केली की दोन घास जेवण जास्तच जाते असे म्हटले तर वावगे होणार नाही.मनसोक्त आणि चविष्ट मांसाहारी पदार्थ आणि ते देखील वाजवी किंमतीत म्हणजे हॉटेल शिवराज ही नवी ओळख सद्या बनली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्येही हॉटेल शिवराज आपल्या चवीसाठी तसेच थाळ्यांसाठी प्रसिध्द होत आहे.

 

शिवराज हॉटेलचे मालक अतुल वायकर म्हणाले, “एकदा या आणि आमचे पदार्थ चाखून बघा. मी अवघ्या पन्नास हजार रुपयांच्या भांडवलात वडगावमध्ये प्रथम शिवराज हाॅटेल नावाने व्यवसायास सुरुवात केली. 2011 साली सुरू केलेले हे हॉटेल छोटेसे होते. पण येथील गावरान चिकन हंडीने खवय्यांची मने जिंकली. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली. आमच्या गुणवत्तापूर्ण आणि चविष्ट थाळ्यांमुळे देश पातळीवर आमचा नावलौकिक झाला असून, हॉटेल शिवराजची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्येही हॉटेल शिवराज आपल्या चवीसाठी तसेच थाळ्यांसाठी प्रसिध्द होत आहे. आपण सर्वांनी केलेल्या भरभरून प्रेमाची ही पावती आहे. याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे ऋणी आहोत.”

 

वडगाव येथील युवा उद्योजक अतुल वायकर यांनी 11 वर्षापूर्वी हे शिवराज हॉटेल सुरू केले. आज या हॉटेलच्या तीन शाखा तालुक्यात आहेत. येथे या शिवाय स्पेशल कडकनाथ चिकन, स्पेशल गावरान चिकन, स्पेशल मटन भाकरी, पापलेट, सुरमई, मांदेली, प्रॉन्स, चायनीज, कबाब, तंदुरी डिशेस देखील उपलब्ध आहेत. तसेच खास गावरान चव चाखायची असेल तर चुलीवरची ज्वारी व बाजरीची भाकरी आणि मावळची खासियत असलेला इंद्रायणी तांदुळाचा चविष्ट आणि सुगंधी भात देखील मिळेल. या हॉटेलमध्ये फॅमिलीसाठी विशेष बैठक व्यवस्था आहे. त्यामुळे इतर हॉटेलपेक्षा सहकुटुंब जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी लोक शिवराज हॉटेलला विशेष पसंती देताना दिसत आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.