Cricket : राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक पदी कायम; बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा

एमपीसी न्यूज – आयसीसी विश्वचषक 2023 नंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य ( Cricket ) प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा करार संपुष्टात आला होता. त्यानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक बदलण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या चर्चांना बीसीसीआय ने पूर्णविराम दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी राहुल द्रविड हे कायम राहणार असल्याची माहिती आज त्यांनी जाहीर केली आहे. त्यासोबतच त्यांचे सहकारी प्रशिक्षक देखील कायम राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले की, राहुल द्रविडच्या दूरदृष्टीमुळे टीम इंडियाने अनेक यश मिळवले.

मुख्य प्रशिक्षक पदाबाबत बीसीसीआय ने राहुल द्रविड यांच्याशी फलदायी चर्चा केली. या चर्चेनंतर बीसीसीआयने राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ वाढवण्यास एकमताने सहमती दर्शवली. टीम इंडिया (वरिष्ठ पुरुष) यांच्या कराराची मुदतवाढ जाहीर केली आहे. द्रविडसोबतच टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसाठी (वरिष्ठ पुरुष) देखील करार वाढवण्यात आला आहे.

Talawade : ज्येष्ठ नागरिकाच्या तोंडाला मिरची पावडर फासून 27 लाखांची चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अटक

आतापर्यंत, राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होता, त्याच्या सपोर्ट स्टाफसह, विक्रम राठोड फलंदाजी प्रशिक्षक होते, टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते आणि पारस महांबरे गोलंदाजी प्रशिक्षक होते. हा स्टाफ कायम राहणार आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20 मालिका खेळली जात असताना व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहे. पण पुढच्या महिन्यात जेव्हा दक्षिण आफ्रिकेसोबत मालिका खेळवली जाईल, तेव्हा राहुल द्रविड पुन्हा आपली जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, “राहुल द्रविडची दूरदृष्टी, व्यावसायिकता आणि दृढनिश्चय हे टीम इंडियाच्या यशात महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने तुमची नेहमीच अत्यंत छाननी होते आणि मला याचा अभिमान आहे.” असेही बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले.

आनंद व्यक्त करताना राहुल द्रविड काय म्हणाला?

मुख्य प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ मिळाल्यानंतर राहुल द्रविड म्हणाला, “माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, माझ्या दृष्टीला पाठिंबा दिल्याबद्दल आणि या काळात पाठिंबा दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो.”

राहुल द्रविड ने करार संपल्यानंतर आपल्याला कुटुंबियांना वेळ द्यायचा असल्याचे कारण सांगितले होते. त्यामुळे बंगलोर येथे असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्य करण्यास इच्छुक असल्याचेही वृत्त यापूर्वी प्रसिद्ध करण्यात ( Cricket ) आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.