Cricket : 12 वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे 2 ते 17 जानेवारी 2024 दरम्यान पिंपरीत आयोजन 

एमपीसी न्यूज – पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या (Cricket)वतीने सालाबादप्रमाणे युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे दृष्टिकोनातून नववर्ष प्रारंभी 12 वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप”  ह्या एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले आहे.
2 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 दरम्यान होणाऱ्या (Cricket)ह्या स्पर्धेत यजमान व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीच्या दोन संघासह आर्यन्स क्रिकेट अकॅडमी,विराग क्रिकेट अकॅडमी, ऑल स्टार क्रिकेट अकॅडमी, ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी, 22 यार्ड्स क्रिकेट अकॅडमी, मेव्हरिक्स क्रिकेट अकॅडमी, अशा नामांकित आठ संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.
सुरुवातीला दोन गटात साखळी सामने होतील व गुणानुक्रमे चार अव्वल संघांमध्ये उपांत्यफेरीचे सामने होतील.
अंतिम सामना  16 जानेवारी 2024 रोजी  होईल,

थेरगाव येथील मैदानावर 02 जानेवारी 2024 रोजी स्पर्धेचे उदघाटन होईल , स्पर्धेतील सर्व सामने
थेरगाव येथे होतील, प्रत्येक सामना 35 षटकांचा असेल,
प्रत्येक सामन्यातील योद्धा खेळाडू, सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज,क्षेत्ररक्षक व स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना तसेच उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येईल. पारितोषिक वितरण 23 मे 2023 रोजी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांचे शुभहस्ते होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.