Pimpri : लग्नात दिला 1375 गुलाबांच्या फुलांचा गुच्छ भेट;इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली नोंद

एमपीसी न्यूज – डॉ. हरके यांनी रविवारी पिंपरी चिंचवड येथे (Pimpri )त्यांचे भाचे नीरज घोंगडे आणि प्रतिक्षा उडगे यांच्या विवाह सोहळ्या निमित्त 1375 गुलाबांच्या फुलांचा विश्वविक्रमी गुच्छ भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या पुष्पगुच्छची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असून नोंद झाल्याचे प्रमाणपत्र नव वधू वरांना देण्यात आले.

यावेळी संयोजक डॉ. दीपक हरके, नवनाथ घोंगडे, ज्योती घोंगडे, अनिकेत हरके, विहान हरके, सुप्रिया हरके, रमेश कुदरी, सुमित कुदरी, स्वाती कुदरी आदींसह वधू वरांचे नातेवाईक उपस्थित होते.

Pimpri : पीएमपी बस प्रवासात दीड लाखाचे मंगळसूत्र लंपास

नीरज चे आजोबा सुरेश विश्वनाथ हरके (Pimpri)यांच्या हस्ते हा विश्व विक्रमी गुच्छ आणि आजी संगीता सुरेश हरके यांच्या हस्ते इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र नव वधू वरांना देण्यात आले.

अहमदनगर शहरात राहणाऱ्या दीपक हरके यांना विश्वविक्रम करण्याचा छंद जडला आहे. एकामागून एक विक्रम करीत तब्बल 181 विश्वविक्रम त्यांनी केले आहेत.

यापूर्वी त्यांनी केलेल्या 181विक्रमांची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. या अनोख्या आणि वेगवेगळ्या विक्रमामुळे त्यांना फ्रान्स येथील थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सन्माननीय डि. लीट. पदवी प्रदान केली आहे.

डॉ. हरके यांच्या संकल्पनेतून अहमदनगर येथील शुभ फ्लॉवर्स अँड डेकोरेटर्स ने हा गुच्छ सहा तासात बनविला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.