Alandi: श्री क्ष्रेत्र देहू ते श्री क्षेत्र आळंदी पर्यंत पर्यावरण जनजागृती पदयात्रा

एमपीसी न्यूज -पिंपरी चिंचवड शहरातील प्रदूषण तसेच (Alandi)इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी दि.31 डिसेंबर रोजी पर्यावरण जनजागृती पदयात्रा श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र आळंदी देवाची अशी आयोजित करण्यात आली होती.श्री क्षेत्र देहू( नदी घाट)येथून सकाळी 8 वाजता या पद यात्रेला सुरवात झाली होती.

त्याचा आळंदी येथील विश्व शांती केंद्र नदी घाट येथे दुपारी एक वाजता या पदयात्रेचा समारोप झाला. देहू व आळंदी ही महाराष्ट्राची दोन बलाढ्य शक्ती आणि ऊर्जा स्थान आहेत .संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांनी सर्व जगाला विचारांची आणि आचारांची संतवानी दिली.यांच्याच साक्षीने व आशिर्वादाने महाराष्ट्राच्या येणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी व एक स्वच्छ सुंदर पर्यावरण देण्यासाठी देहू ते आळंदी असा प्रवास करत पर्यावरण लढ्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी प्रशांत राऊळ यांनी या पर्यावरण जनजागृती पदयात्रेत सहभागी झालेल्या सामाजिक ,राजकीय व आध्यात्मिक संस्थेचे आभार मानले.तसेच ते म्हणाले आपल्या ज्या नद्या आहेत त्यांना आपण जीवन म्हणायचो,इंद्रायणी नदीला आपण इंद्रायणी माता म्हणतो.देहू ते आळंदी पर्यँत नदीकाठच्या गावातून मैलामिश्रित व रासायनिक पाणी हे इंद्रायणी नदी मध्ये सोडले जाते.

Chinchwad : संकष्ट चतुर्थीच्या दिवशी धार्मिक, सामाजिक उपक्रमांनी संजीवन समाधी महोत्सवाचा दुसरा दिवस गाजला

नदीच्या ज्या प्रणाली आहेत,ओढे व नाले ,झरे यावर अतिक्रमण होत आहेत.त्यांचे जीवन संपवले जात आहे.या नदीच्या या प्रणाली संपवतो त्यामुळे नदी संपवतो.नदीला जीवनदाहिनी म्हटले जाते.जीवनदाहिनी संपली तर आपण संपणार आहोत. हे कुठं तरी कळाले पाहिजे.आपण पुढच्या पिढी साठी काय सोडून चाललो आहोत,विषारी पाणी,विषारी अन्न विषारी वायू ज्याच्या मुळे त्यांना रोगीआरोग्य देऊन चाललो आहोत.यासाठी नागरिकाने जागे होण्याचे गरजचे आहे.सर्व गोष्टी प्रशासन ,सरकार अपेक्षा करून चालणार नाही.लोकांनी सर्व गोष्टी हातात घेऊन पुढे केले पाहिजे.लोकसहभागातून या गोष्टी शक्य आहे.

लोकांनी आपली प्रशासकीय व सामाजिक व्यवस्था समजून घेतली पाहिजे.कोणते विषय नगरपालिका, राज्यसरकार व केंद्रासरकार मध्ये येतात.आपण नेमकं कोणा कडे जाऊन सांगायचं हे कळलं पाहिजे.अधिकार व अंमलबजावणी हे दोन्ही झाली पाहजे.

यावेळी एका सामाजिक संस्थेने राम झरा विषयी माहिती दिली.तसेच महानगरपालिकेचे माहिती प्रमाणे 21 एस टी पी आहेत.या एस टी पी चे खरंच पाणी शुद्ध होत आहे का?प्रक्रिया केली जाते का?असा प्रश्न उपस्थित केला.पिंपरी चिंचवड शहरासाठी सह शहर अभियंता पर्यावरणा साठी वेगळा अधिकारी आहे अशी माहिती देत त्या आधिकऱ्यावर ताशेरे ओढले.

या पर्यावरण जनजागृती मध्ये इंद्रायणी जल मित्र,महाराष्ट्र नवनिर्माण सेना,ग्रीन आर्मी पिंपरी चिंचवड ,अंघोळीची गोळी, वृक्ष मित्र,आळंदी जनहित फाऊंडेशन,इंद्रायणी सेवा फाऊंडेशन ,उद्धव ठाकरे शिवसेना व इतर सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या.यावेळी प्रदूषणा बाबत अभ्यास व प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना,ध्येय धोरण याविषयी येथे माहिती देण्यात आली.

इंद्रायणी जल मित्रचे प्रकाश जुकंटवार,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जयसिंग भाट व ग्रीन आर्मी पिंपरी चिंचवडचे प्रशांत राऊळ यांनी या पदयात्रेचे आयोजन केले होते.यावेळी अर्जुन मेदनकर, विठ्ठल शिंदे,जनार्धन पितळे,राहुल चव्हाण व इतर पर्यावरण प्रेमी मान्यवर उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.