Talegaon : घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांकडून गोळीबार

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

एमपीसी न्यूज – घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी गोळीबार केला. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे शहरातील मस्करनेस कॉलनी मध्ये घडली.

पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे मधील मस्करनेस कॉलनी येथे काही चोरटे घरफोडी करण्याच्या उद्देशाने आले होते. ते घरफोडी करू शकले नाहीत. त्यांचा घरफोडीचा(Talegaon) कट उधळला गेला.

नागरिक आपल्याला पकडून मारतील या भीतीने त्यांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर चोरटे पळून गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींचा(Talegaon) शोध सुरू केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Nigdi : ट्रकच्या धडकेत अपंग व्यक्तीचा मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.